आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Cooperative Election Authority Set Up Chief Minister

सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना लवकरच - मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सहकार निवडणूक प्राधिकरण लवकरच अस्तित्वात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. त्यामुळे मुदत संपलेल्या सुमारे पन्नास हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्राधिकरणामार्फत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


राज्यात सुमारे 2 लाख 40 हजार सहकारी संस्था असून या संस्थांचे सुमारे पाच कोटी सभासद आहेत. राज्यातील सहकाराला लागलेली भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी पावसाळी अधिवेशनात नव्या सहकार विधेयकाला मंजुरी देण्यात आली व त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्यानुसार 31 डिसेंबरपूर्वी कुठल्याही परिस्थितीत सहकार प्राधिकरणाची स्थापना करणे बंधनकारक करण्यात आले असून सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया याच प्राधिकरणामार्फत होणार आहेत. त्यानुसार सध्या सुमारे पन्नास हजार संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यांच्या निवडणुका प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत. परंतु, प्राधिकरणासाठी मनुष्यबळाची तरतूद करूनही अद्यापही त्याचे अस्तित्व कागदावरच राहिल्यामुळे या संस्थांच्या निवडणुका
लांबणीवर पडल्या आहेत.