आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Dabholkar Killer Come Under Police Surveliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपी पोलिसांच्‍या हातीः दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी लवकरच मोठा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आठवडा उलटून गेला तरी कोणतेही धागेदोरे हाती लागत नसल्याचे पोलिसांकरवी सांगितले जात आहे. तथापि, मारेकरी पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात पोलिस या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे समजते.

सनातन संस्थेने आपल्या मुखपत्रात दाभोलकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे झुकलेली होती. मात्र यामागे संस्थेचा हात असल्याबाबत गृह विभागाने किंवा पोलिस अधिका-यांनी काहीही सांगितलेले नाही. संस्थेनेही हत्येत हात नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला जाणार असल्याचे ज्येष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. या वेळी राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटीलही उपस्थित असतील, असे या वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. मारेकरी पकडले गेल्यामुळे हा गौप्यस्फोट करण्यात येणार काय, अशी विचारणा या अधिका-यांकडे केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. खुनी पकडले गेलेत की जाणार आहेत हे आपण अद्याप सांगू शकत नाही. मात्र प्रकरणाचा गुंता येत्या आठवड्यात संपणार आहे, असे ते म्हणाले.


या प्रश्नांची मिळतील उत्तरे
०हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार कोण?
०गोळ्या झाडून खून नेमका कोणी केला?
०कोणत्या कारणासाठी हत्याकांड झाले?
आबा, आयुक्तांना पवारांची ताकीद
दाभोलकर यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, अशी ताकीद केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आर.आर. पाटील व पुण्याचे आयुक्त गुलाबराव पोळ यांना दिल्याचे समजते.