आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Reservation For The Muslim Salaman Khurshid

मुस्लिमांना लवकरच आरक्षण - सलमान खुर्शीद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जुलै महिन्यांत केंद्राच्या साडेचार टक्के आरक्षणाच्या निर्णयाला न्यायालयाकडून अंतरिम आदेश मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुस्लिम
आरक्षणाचा प्रश्न ऑक्टोबरपर्यंत मार्गी लागेल, अशी अपेक्षा केंद्रीय परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली.
सच्चर समितीच्या अहवालास सात वर्षे झाल्याबद्दल भायखळा येथील साबू सिद्दिकी महाविद्यालयात ‘मुस्लिम आरक्षण’ विषयावर रविवारी परिषद झाली त्या वेळी ते बोलत होते.

‘यूपीए’ सरकारने 2001 मध्ये इतर मागासवर्ग म्हणून मुस्लिम समाजाला 4.5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. ‘पुढच्या महिन्यात होणा-या सुनावणीत न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयाला अंतरिम दिलासा मिळू शकेल. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागेल, अशी आशा खुर्शीद यांनी व्यक्त केली. मदरशांना पाच लाख : राज्यातील सर्व मदरसांना पायाभूत सुविधांसाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी या वेळी केली.