आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Special Emergency Room And Management Cours In State's Hospital

लवकरच राज्यातील रुग्णालयांत विशेष तत्काळ कक्ष व व्यवस्थापनाचा कोर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रात्री अपरात्री येणा-या गंभीर रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये संलग्न असणा-या राज्यातील रुग्णालयांमध्ये विशेष तत्काळ उपचार कक्ष स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाचे धडे देणारा कोर्सही सुरू करण्याच्याही हालचाली सुरू आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने अर्थविभागाकडे प्रस्ताव दिल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने ‘दिव्य मराठी’ला दिली.

एखादा रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांवर आणि रुग्णालयांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा आढावा घेतला असता रुग्णालयांमध्ये रात्री काम करणा-या शिकाऊ निवासी डॉक्टरांमुळे असे प्रसंग उद्भवत असल्याचेही एक कारण समोर आले. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करून काही नवे उपाय योजले आहेत.

वेळेत उपचार न झाल्याने होतात हल्ले
हृदयविकाराशी संबंधित रुग्ण रात्री रुग्णालयात आल्यास तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला वेळेत ईसीजी काढणे, सीटीस्कॅन करणे अथवा संबंधित उपचार करणे शक्य होत नाही. अशावेळी रुग्ण दगावला असता त्याचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतात, रुग्णालयाची तोडफोड करतात. असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने नव्या उपाययोजना करायचे ठरवले असून तसा प्रस्ताव वित्त विभागाकडे दाखल केला आहे.

राज्यातील 14 महाविद्यालयांत अंमलबजावणी
राज्यातील सर्वच म्हणजे 14 शासकीय महाविद्यालयांत तज्ज्ञ डॉक्टर असलेला विशेष उपचार कक्ष 24 तास सुरू राहणार आहे. यामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल होणा -या रुग्णावरही वेळेत आणि योग्य उपचार होऊ शकतील. या रुग्णालयांमधील अनागोंदी कारभार थांबून शिस्तबद्ध पद्धतीने कारभार व्हावा,यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालय व्यवस्थापन कोर्सही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना प्रशासकीय कारभाराचे ज्ञानही मिळणार असून त्याचा रुग्णालयासह रुग्णांना फायदा होणार असल्याचा दावा संबंधित अधिका-यांनी केला.