आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलपटू अशोक खळे यांचे उपचारादरम्यान निधन, कुटुंबियांकडून अपघाताच्या चौकशीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील राष्ट्रीय सायकलपटू अशोक खळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते 64 वर्षाचे होते. मागील आठवड्यात मुंबई ते खोपोली दरम्यान सायकल प्रवासादरम्यान मानखुर्द येथे सायन-पनवेल हायवेवर अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर शनिवारी रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घाटांचा राजा म्हणजे किंग ऑफ घाट अशी त्यांची ओळख होती. मुंबई-पुणे सायकल शर्यतीदरम्यान खंडाळ्याचा घाट सर्वात वेगाने पार करण्यासाठी खळे ओळखले जायचे.
 
5 नोव्हेंबर रोजी खळे यांना मानखुर्दच्या फ्लायओव्हर उतरल्यानंतर एका कारने खळे यांना धडक  दिली होती. या धडकेत खळे यांना गंभीर दुखापत झाली होती. खळे यांच्या मेंदूला जखम झाल्याने ते बेशुद्धावस्थेत होते. अखेर मृत्यूशी सहा दिवस झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, खळे यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खळे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
 
अशोक खळे दादर येथे वास्तव्यास होते. त्यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला. इटलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपली छाप सोडली होती. नवी दिल्लीत 1982 साली झालेल्या आशियाई गेम्ससाठीच्या निवड चाचणीत अशोक खळे यांच्या पायाचे हाड मोडले होते. सायकलिंगमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना ‘शिव छत्रपती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...