आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा धोरणासाठी कुलगुरूंची समिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याच्या क्रीडा आणि युवा धोरणाच्या घोषणेनंतर गेल्या सहा महिन्यांत त्याच्या अंमलबजावणीत फारशी प्रगती झालेली नाही. त्यासाठी सरकारने आता राज्यातील सर्व कुलगुरूंचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीच्या माध्यमातून क्रीडा आणि युवा धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जून 2012 मध्ये नवे क्रीडा आणि युवा धोरण लागू केले. या क्रीडा धोरणात 58 तर युवा धोरणात 20 शिफारशी आहेत. याचा लाभ सर्व नागरिकांना होणार असला तरी स्पर्धाक्षम खेळाडू म्हणून 18 ते 35 वयोगटाचा विचार करण्यात आला.

वयोमर्यादेपूर्वी सर्वसाधारण युवक हे विद्यापीठ स्तरावरच शिक्षण घेत असतात. त्यामुळे दोन्ही धोरणांचे यश हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात असल्याने धोरणातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर कुलगुरूंचे संयुक्त मंडळ यांची उपसमिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

क्रीडामंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत दोन्ही विभागांचे राज्यमंत्री हे संयुक्त उपाध्यक्ष असणार आहेत. समितीच्या सदस्यपदी सर्व कुलगुरू, विभागांचे सचिव, विद्यार्थी कल्याण संचालक, ऑलिम्पिक आणि अ‍ॅथलेटिक संघटनांचे संचालक आहेत. धोरणाबाबत कार्यवाहीसाठी उपायययोजना करणे आणि त्या अनुषंगाने बैठका घेऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल देणे, अशी समितीची कार्यकक्षा असेल.