आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Of Mumbai University Today Paid Visit To MNS Chief Raj Thackeray's House At Shivaji Park To Meet Him.

मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. संजय देशमुख राज ठाकरेंच्या भेटीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आज दुपारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या दादरमधील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी ही भेट झाली. डॉ. संजय देशमुख यांनी 15 दिवसापूर्वीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून पदभार हाती आहे. मावळते कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांचा 6 जुलै रोजी कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.
दरम्यान, ही राजकीय भेट नसून, मुंबई विद्यापीठाशी संबंधित भेट असल्याचे कुलगुरु देशमुख यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातील पारदर्शकता आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने विविध तज्ज्ञांच्या मी भेटी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज ठाकरेंची भेट घेतल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. केवळ राज ठाकरेंच नव्हे तर उद्धव ठाकरेंसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या तज्ञमंडळींची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाबाबत त्यांची मते अजामावून पाहणार आहे असेही त्यांनी सांगितले.