आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No \'Victoria\' Rides After A Year As Bombay High Court Orders Ban

\'व्हिक्टोरिया\'वर वर्षभरात बंदी घाला उच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत प्रसिद्ध असलेल्या "व्हिक्टोरिया' घोडागाड्यांवर वर्षभरात कायमस्वरूपी बंदी घालावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला सोमवारी दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. ओक आणि ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संघटनेने जनहित याचिका दाखल केली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती मेनन यांनी निर्देश देताना सांगितले की, घोडागाडी चालवणे पूर्णपणे बेकायदा आहे. यामुळे प्राण्यांची खूप अवहेलना होते. त्यामुळे वर्षभरात मुंबईतील व्हिक्टोरिया गाड्यांवर पूर्णपणे बंदी घालावी. तसेच याबाबचा अंतिम अहवाल हा जानेवारी २०१६ पर्यंत सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील व्हिक्टोरिया घोडागाड्यांवर बंदी घालण्याची मागणी प्राणिमित्र संघटना करत आहेत.

७०० कुटुंबांचे पुनर्वसन करा
व्हिक्टोरियाघोडागाड्यांवर मुंबईतील सुमारे ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे राज्य सरकारने अशा कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी एखादी हितकारी योजना राबवावी, असे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.

घोड्यांना प्राणी संघटनांकडे सोपवा
व्हिक्टोरियावरपूर्णपणे बंदी आणल्यानंतर घोड्यांचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे या घोड्यांना एखाद्या नामवंत प्राणी संघटनेकडे देखभालीसाठी सोपवावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.