आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेल्सचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, गैरवर्तनसोबत पोलिसांना हासडल्या शिव्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- पोलिसांसी हुज्जत घालताना पूजा मिश्रा व श्रुती गुप्ता या दोन मॉडेल्स) - Divya Marathi
(छायाचित्र- पोलिसांसी हुज्जत घालताना पूजा मिश्रा व श्रुती गुप्ता या दोन मॉडेल्स)
मुंबई- तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोन मॉडेल्सनी मुंबईतील डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये रविवारी रात्री गोंधळ घातला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता अशी त्यांची नावे आहेत.
पूजा आणि श्रुती रविवारी रात्री अंधेरी वेस्टच्या लिंक रोडवरील एका एटीएमजवळ थांबल्या होता. तेव्हा दोन तरुणांनी त्यांची छेड काढली. या वेळी तिथे पोलिसांना पाहून हे तरुण पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जाणीवपूर्वक सोडल्याचा आरोप दोघींनी केला. या घटनेची तक्रार घेऊन दोघी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी नंतर दोन तरुणांना अटकही केली. मात्र, या दोघांना मॉडेल्सनी ओळखले नाही. खऱ्या आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातला. या दोन मॉडेल्सनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसह दोघांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे.
पुढे छायाचित्रातून पाहा, या दोन मॉडेल्स कसे गैरवर्तन करीत आहेत...
बातम्या आणखी आहेत...