आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत तयार झाला व्हिडिओकॉन ४ के टीव्ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एन स्क्रीन व होम क्लाउड तंत्राद्वारे टीव्हीला स्मार्टफोन जोडता येणारा ४-के अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) टीव्ही व्हिडिओकॉनने मंगळवारी सादर केला. तो व्हिडिओकॉनच्या औरंगाबादेतील प्रकल्पात तयार झाला आहे. हा सर्वाधिक फीचर्स असलेला देशातील पहिला यूएचडी टीव्ही असल्याचा दावा व्हिडिओकॉनचे सीओओ सी. एम. सिंह यांनी केला.

किंमत : ४- के टीव्ही ४० ते ८५ इंच स्क्रीनमध्ये असून किंमत ९१ हजारांपासून सुरू होते.
४ -के ही क्रांती : ४-के हा क्रांतिकारी प्रयोग असून तेच टीव्ही क्षेत्राचे भवितव्य आहे. याद्वारे कंपनीने टीव्ही विक्रीत ५० टक्के वाढीचे उद्दिष्ट ठरवले आहे. - अनिरुद्ध धूत, संचालक, व्हिडिओकॉन

वैशिष्ट्ये : *स्मार्टफोनचे अनेक अ‍ॅप्स टीव्हीवरही वापरता येतात. थ्री-डी सुसंगत.*एमएचएल इंटरफेसमुळे स्मार्टफोन टीव्हीला जोडलेला असताना त्याची बॅटरीही चार्ज होते.* रिमोटला हलका स्पर्श करून टीव्हीवरील कार्यक्रम नियंत्रित करता येतात.