आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेची ‘ती’ देणगी टायपो एररने ८५ कोटी, व्हिडिओकॉन ग्रुपचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेला ८५ कोटी रुपये देणगी दिल्याच्या प्रकरणात व्हिडिओकॉन ग्रुपने स्पष्टीकरण दिले आहे. ग्रुपनुसार, टायपो एररमुळे (टायपिंगमधील चूक) ही रक्कम ८५ लाखांची ८५ कोटी झाली होती. शनिवारी एका इंग्रजी वृत्तपत्राने व्हिडिओकॉन ग्रुपद्वारे शिवसेनेस ८५ कोटी रुपये देणगी दिल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर शिवसेना व व्हिडिओकॉन दोघांनीही निवडणूक आयोगास यासंदर्भात दुरुस्ती विवरण पत्र पाठवले आहे. व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन व्ही.एन. धूत यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१५-१६ मध्ये शिवसेनेस ८५ कोटी रुपये नव्हे तर ८५ लाख रुपयांची देणगी दिली होती. टायपोग्राफिकल चुकीबाबत शिवसेना व ग्रुपने निवडणूक आयोगास वेगवेगळी माहिती दिली आहे. व्हिडिओकॉनचे जनसंपर्क अधिकारी सुनील टंडन यांच्यानुसार, निवडणूक आयोगास फॉर्म सादर करतेवेळी शिवसेनेच्या अकाउंटंटने पॉइंटची चूक केली. यामुळे ही रक्कम ८५ लाखांऐवजी ८५ कोटी रुपये झाली.

शिवसेनेही म्हटले टायपिंगची चूक
शिवसेनेही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाच्या पत्रकानुसार, शिवसेनेस २०१५-१६ मध्ये व्हिडिओकॉन समूहाकडून ८५ कोटी नव्हे तर ८५ लाख रुपये देणगी मिळाली आहे. विवरणपत्रात टायपिंगच्या चुकीमुळे वृत्तपत्रांनी चुकीची माहिती छापली. निवडणूक आयोगाला दिलेल्या विवरण पत्रातील चूक लक्षात आल्यावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आयोगास याबाबत माहिती दिली.

पुढील स्लाईडवर पाहा, शिवसेनेच्या सुधारीत फॉर्मचा स्क्रीन शॉट.......
बातम्या आणखी आहेत...