आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhan Parishad Congress Gives Ticket Manikrao, Sanjay Dutt, Ranpise

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून संजय दत्त, रणपिसे, माणिकरावांना तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे यांना शुक्रवारी उमेदवारी देण्यात आली. अर्ज भरण्याची शनिवारी शेवटची तारीख असून चौथ्या उमेदवाराचे नाव रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. माणिकरावांचे सर्मथक शरद रणपिसे यांच्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्ती उमेदवार उल्हास पवार यांचा पत्ता कट झाला आहे.
रणपिसे हे सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष असून दलित समाजातले आहेत. अनेक वर्षे काँग्रेसचे काम त्यांनी केले असून माणिकरावांनी त्यांच्या नावासाठी शब्द टाकल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे निश्चितच होते. त्याच वेळी संजय दत्त यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांचा एका जागेवर दावा होताच. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची जागा मिळवून दिल्याचे बोलले जाते. काँग्रेस पक्षाकडे चार उमेदवार निवडून येण्याएवढी मते नसल्याने मुख्यमंत्र्यांनी चौथ्या उमेदवाराला विरोध केला होता. पण उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चौथा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने चौथा उमेदवार त्यांचा निकटवर्तीय असेल, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे माणिकराव, एस. क्यू. जामा, राजन तेली आणि उल्हास पवार हे निवृत्त झाले आहेत.
अमर पंडित, नरेंद्र पाटलांकडे आठ कोटींची संपत्ती !
विधान परिषद : शेलार, पंडित, गायकवाड, भाई गिरकर यांना संधी