आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhan Parishad Election Maharashtra 11 Candidate

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, काँग्रेसने चौथी उमेदवारी टाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेच्या २५ जुलै रोजी होणा-या ११ जागांच्या निवडणुकीसाठी अकराच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या उमेदवारांची बिनविरोध निवड होणार हे नक्की झाले असून, केवळ निकालाची औपचारिकता बाकी आहे. १८ जुलै उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख आहे. याच दिवशी निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे संजय दत्त, शरद रणपिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नरेंद्र पाटील, जयदेव गायकवाड आणि अमरसिंह पंडित यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भारतीय जनता पक्षाने आशिष शेलार, विजय गिरकर, यांना तर शिवसेनेने विनायक राऊत आणि अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

११ जागांसाठी ही निवडणूक होत असून अकराच अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी दुपारी तीन पर्यंतची होती. काँग्रेस चार उमेदवार उभे करणार असे दिल्लीतील बैठकीत ठरले होते. त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध होता. चौथा उमेदवार उद्योगमंत्री नारायण राणे यांचा निकटवर्तीय असल्याचे सुत्रांकडून समजले होते. चौथा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी राणे यांच्यावर टाकण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने चौथा उमेदवार न दिल्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार अशी चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचाच फायद शिवसेनेला झाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७५ मतांची गरज आहे. त्यांच्याकडे स्वपक्षाची ६२ आणि अपक्षांची १३ मते आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी फारकाही अडचण नव्हती.
भारतीय जनता पक्षाकडे ४६ मते आहेत. त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार मतांची गरज भासणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संबंधाचा फायदा येथे भाजपला होऊ शकतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेची सहा मते भाजपच्या पारड्यात पडणार आहेत.
विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेकडून राऊत, परब यांना उमेदवारी
मुंडे यांचे कट्टर समर्थक पाशा पटेलांचा पत्ता कट
विधान परिषद : आशिष शेलार, अमरसिंह पंडित, जयदेव गायकवाड, भाई गिरकर यांना संधी