आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhan Parishad Election Maharashtra Shivsena Candidate Diclear

विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेकडून राऊत, परब यांना उमेदवारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील विधानपरिषद निवडणूक अर्ज भरण्याची मुदत काही तासांवर येऊन ठेपली असतांना शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. विनायक राऊत आणि अनिल परब हे दोन उमेदवार शिवसेनेने रिंगणात उतरवले आहेत.
शिवसेनेचे कोकणातील नेते परशुराम उपरकर यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती मात्र, शिवसेना नेत्यांकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे कोकणात बंडाळी माजण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेसने अद्याप चौथा उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून नारायण राणेगटातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यत वर्तवली जात होती. हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही राणेंवरच टाकण्यात आली होती. मात्र, दुपारी १ पर्यंत काँग्रेसकडून चौथ्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून संजय दत्त, रणपिसे, माणिकरावांना तिकीट
विधानपरिषद निवडणूक रंगतदार होणार, काँग्रेस चार जागा लढविण्याच्या तयारीत