आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेत राष्ट्रवादीला धक्का, भंडारा, यवतमाळ, साताऱ्याच्या जागेवर दणकून पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / पुणे - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा रिक्त जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला माेठा धक्का बसला अाहे. या सहापैकी चार जागा ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा केवळ पुण्याची जागा राखण्यात यश अाले असून इतर तीन जागा अनुक्रमे काँग्रेस (सातारा- सांगली), भाजप (भंडारा- गाेंदिया) व शिवसेनेकडून (यवतमाळ) या पक्षांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचून नेल्या. दाेन जागा मिळवणारी काँग्रेस व भाजपने पूर्वीपेक्षा प्रत्येकी एका जागेवर फायदा मिळवला असून, शिवसेनेच्या पदरातही एक जास्तीची जागा पडली आहे. विधान परिषदेच्या या सहाही जागांसाठी शनिवारी मतदान झाले हाेते. मंगळवारी मतमाेजणी करून निकाल जाहीर करण्यात अाले.

नांदेड दुसऱ्यांदा काँग्रेसकडेच
माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांचे समर्थक व काँग्रेसचे विद्यमान अामदार अमर राजूरकर हे ४३ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठीशी ताकद उभी केली हाेती. मात्र शिंदे यांना २०८ तर राजूरकरांना २५१ मते मिळाली.

यवतमाळमध्ये शिवसेना :भाजप युतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांचा २७० मतांनी पराभव केला. एकूण ४३३ मतदानापैकी सावंत यांना ३४८ तर बडे यांना ७८ मते मिळाली. एेनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या संदीप बाजाेरिया यांच्या पारड्यातही २ मते पडली. पाच मते अपात्र ठरली.

भंडारा-गोंदियात भाजप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके हे विजयी झाले. डॉ. फुके यांना ३८७ मतांपैकी पहिल्या पसंतीची १५३ तर दुसऱ्या पसंतीची ६७ अशी एकूण २२० मते मिळाली. राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांना १३७ तर काँग्रेसच्या प्रफुल अग्रवाल यांना ११२ मते मिळाली. ५ मते अवैध ठरली.

जळगावात भाजप : भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल ४२१ मते घेत विजयी झाले. अपक्ष उमेदवार अॅड. विजय पाटील यांना ९० मते मिळाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईमुळे या ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अाणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली हाेती. त्यामुळे पटेल यांचा िवजय साेपा झाला. अॅड. पाटील यांना एकूण १०३ मते मिळाली हाेती, मात्र त्यातील १३ मते बाद ठरली. दुसरे अपक्ष उमेदवार अखलाक शेख यांना एकच मत मिळाले.

राष्ट्रवादीने पुणे राखले : पुण्यात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळवला. त्यांना ४४० तर काँग्रेसचे संजय जगताप यांना ७१ मते मिळाली. भाजपचे अशाेक येनपुरे यांना १३३ मतांवर समाधान मानावे लागले.

सांगली- साताऱ्यात काँग्रेस : मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू व काँग्रेस उमेदवार माेहनराव कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर गाेरे यांचा ६३ मतांनी पराभव केला. कदम यांना ३०९ तर गाेरे यांना २४६ मते मिळाली.

पुढील स्लाइडवर वाचा, कोणी मिळवला विजय? कोणाला मिळाली किती मते..?
बातम्या आणखी आहेत...