आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या अटकेसाठी घुटमळले : विधिमंडळात पास नसताना प्रवेश; पोलिस निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बुधवारी विधिमंडळात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक निगडे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक करण्यासाठी दोन पोलिस अधिकारी विधान भवनात आले होते. या दोघांपैकी एकाकडे विधान भवनात प्रवेश करण्याचा पास नसल्याचे उघडकीस आले. याबाबत माहिती देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सभागृहाला सांगितले की, पोलिस अधिकारी व्हटकर यांच्यासोबत आणखी एक अधिकारी होता. व्हटकर यांच्याकडे पास होता, परंतु दुस-या निगडे नावाच्या अधिका-याकडे पास नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निगडे नावाच्या अधिका-याला निलंबित करण्यात येत आहे.

आमदारांच्या अटकेसाठी विधानभवनात येणा-या पोलिसांची कारवाई आकसबुद्धीने

हेतू शुद्ध नाही- पास नसताना विधानभवनात पोलिस येतातच कसे ? हा फौजदारी गुन्हा असून त्यांचा हेतू शुद्ध नाही. पोलिस आकसाने कारवाई करीत आहेत. आमदारांच्या अटकेसाठी सभागृहात येण्याची गरजच काय?
एकनाथ खडसे, विधानसभा विरोधी पक्षनेते

संघर्ष थांबवा- लोकप्रतिनिधी, पोलिस व माध्यमांमधील संघर्ष थांबला पाहिजे. या सर्वच घटकांनी आपल्या मर्यादा पाळण्याची गरज आहे. पासशिवाय विधानभवनात प्रवेश करणाºया दोन्ही पोलिस अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करायला हवी.- सुभाष देसाई, शिवसेना गटनेते, विधानसभा

पोलिसांचा कट ?- आपण व मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आमदारांना अटक होऊ दिली नाही, हा आरोप चुकीचा आहे. आमदारांना विधानभवनात अटक करून राजकारणी गुन्हेगारच असतात, हे दाखवण्याचा पोलिसांचा कट तर नव्हता? - दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष विधानसभा