आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीच्या विद्या पाटील सर्वात श्रीमंत उमेदवार; काँग्रेसच्या १५ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परभणी, लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांसाठी १९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या १२८४ पैकी १२४४ उमेदवारांवर ११४ (९%) उमेदवारांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. यापैकी ६४ (५%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, खंडणी, महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न, दरोडा, दादागिरी, फसवणूक आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे. दरम्यान, या तीनही महापालिकेत परभणी येथील भाजपच्या उमदेवार विद्या पाटील या सर्वाधिक  श्रीमंत उमेदवार अाहेत. त्यांच्या नावावर २७ काेटींची मालमत्ता अाहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने तीन मनपा निवडणुकीतील १२४४ उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले. काँग्रेसच्या १९० पैकी १५ (८%), भाजपच्या १८८ पैकी १० (५%), शिवसेनेच्या १५८ पैकी ८ (५%) आणि राष्ट्रवादीच्या १५१ पैकी ९ (६%) उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालात आढळलेे. 

या अहवालानुसार १२४४ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी त्यांच्याविरोधात महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. एकूण १२५ (१०%) उमेदवार कोट्यधीश असून भाजपच्या १८८ पैकी ४४ (२३%), काँग्रेसच्या १९० पैकी ३१ (१६%), राष्ट्रवादीच्या १५१ पैकी १९ (१३%) आणि शिवसेनेच्या १५८ पैकी १५ (१०%) उमेदवार कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी मालमत्ता ५० लाख रुपये आहे. परभणी येथील १५ ई मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार विद्या प्रफुल्ल पाटील यांची मालमत्ता २७ कोटींपेक्षा जास्त आहे, तर चार उमेदवारांनी शून्य मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. 

निरक्षर उमेदवार ९ %
एकूण १०९ (९%) उमेदवारांनी निरक्षर असल्याचे घोषित केलेे. ११४ (९%) उमेदवार पाचवी पास, १९६ (१६%) उमेदवार आठवी पास, २२६ (१८%) उमेदवार दहावी पास आणि २३८ (१९%) उमेदवार बारावी पास आहेत. २०६ (१७%) पदवीधर असून ७९ (६%) उमेदवार पदव्युत्तरपर्यंत शिकलेले अाहेत.  तर ३४ (३%) उमेदवारांनी त्यांच्या शिक्षणाची कोणतीही माहिती दिली नाही. १२४४ उमेदवारांपैकी ६८२ (५५%) पुरुष उमेदवार असून ५६२ (४५%) महिला उमेदवार आहेत.
बातम्या आणखी आहेत...