आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vijay Kamble May Mumbai Cp, Rakesh Mariya May Transfer As A Pune Cp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी विजय कांबळेंचे नाव आघाडीवर, मारिया पुण्यात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 15 दिवसांपासून मुंबई शहराला पोलिस आयुक्त नाही मात्र आज तो मिळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आयपीए अधिका-यांच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या एस्टॅब्लिशमेंट बोर्डाने सेवाज्येष्ठतेनुसार कांबळे यांचे नाव सुचविले आहे. मात्र सरकारला बोर्डाचे म्हणणे ऐकलेच पाहिजे असे बंधनकारक नसते यामुळे ऐनवेळी बदल करण्यात येऊ शकतो. त्यातच गृहमंत्री आर आर पाटील यांची मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर खप्पा मर्जी कायम असल्याने चव्हाण कांबळेंचे नाव पुढे करणार की आबांच्या म्हणण्यानुसार राकेश मारियांची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे. एकूनच बाबांना कांबळे हवे आहेत तर आबांना मारिया हवे असल्याचे चर्चा आहे.
याचबरोबर एस्टॅब्लिशमेंट बोर्डाने अनेक आयपीएस अधिका-यांच्या बदल्या सुचवल्या आहेत. कांबळे यांची मुंबई आयुक्तपदी वर्णी लागली तर मारियांना पुणे पोलिस आयुक्तपद मिळणार आहे. याचबरोबर सतिश माथूर यांच्याकडे ठाणेचे आयुक्तपद सोपवले जावू शकते. के. पी. रघुवंशी व जावेद अहमद यांना प्रमोशन देऊन इतर ठिकाणी पाठवले जावू शकते. याचबरोबर राज्यातील इतर आयपीएस व वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.