आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडकेंचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांना पदाचा राजीनामा देण्यास मंडळातील काही जणांनी भाग पाडले. गेल्या काही दिवसांपासून मंडळाच्या उपाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाची तक्रार, सभासदांमधले हेवेदावे आणि अध्यक्षांशी होणारे मतभेद यावरून महामंडळ वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. कोल्हापूरच्या मंडळातील सचिव आणि सभासदांनी त्यामुळे कोंडके यांच्याविरोधात ठराव बहुमताने पास करीत त्यांना राजीनामा द्यायला लावला, असे कोल्हापूरच्याच मंडळातील एका अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

मंडळाचा अहवाल बैठकीत सादर होण्याआधीच मागण्यावरून व तो दिल्यानंतरही गोंधळ घालणार्‍या अर्जुन नलावडे, साह्या सानगावकर, सुरेंद्र पन्हाळकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेच, शिवाय त्यांना तो अहवाल आधीच देण्यास सांगणार्‍या कोंडके यांच्या विरोधातही ठराव पास करून त्यांचा राजीनामा संमत करण्यात आला. कोल्हापूर येथील उपाध्यक्षांवर विनयभंगाचे आरोपही करण्यात आले होते. मात्र हे आरोप खोटे आहेत असे सचिवांसह काहींचे म्हणणे होते. कोंडके यांनी याबाबतची भूमिका सचिवांना न पटणारी होती.