आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ferrari ते Silver Ghost पर्यंत, विजय माल्‍याचे लक्झरिअस कार कलेक्‍शन, पाहा PICS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील विविध बँकांना कोट्यांवधी रुपयांना चुना लावून परदेशात पळालेला विजय माल्याला अखेर अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात विजय माल्ल्याला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसने दिली. अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर लंडनमध्ये अटक व सूटका करण्यात आल्याचे वृत्त ‘दूरदर्शन’ने दिले आहे.

मद्यसम्राट म्‍हणून प्रसिद्धी मिळवलेले विजय माल्लाचे व्यक्तिमत्त्व कायम वादग्रस्त राहिले आहे. ओल्‍या पार्टीचा छंद असणारा विजय माल्ल्याला 'बदनाम' गल्लीचा उद्योजकही म्हटले जाते.  लक्झरीअस लाईफस्‍टाइलचा छंद असलेला माल्ल्याला इतर उद्योजक 'पार्टी अ‍ॅनिमल' असे संबोधतात.

किंगफिशर एअरलाइन्‍स तोट्यात आल्‍यांनतर माल्ला यांना उतरती काळा लागली. ते अब्‍जाधिशांच्‍या यादीतून बाद झाले. मात्र त्‍यांचा विविध प्रकारच्‍या कार संकलनाचा छंद मात्र कमी झाला नाही. आज माल्ला उद्योजकांच्‍या यादीत कुठेच नसले तरी त्‍यांच्‍याकडे फरारी 1965 कॅलिफोर्निया स्‍पायडर, Ensign MN08, रॉल्स रॉयस 1913 Silver Ghost, जगुआर XJ220, जगुआर XJR15 रेस विविध प्रकारच्‍या कारचे कलेक्‍शन पाहायला मिळते. आजही जगभरतील विविध देशात त्‍यांची आलिशान महाल आहे.

प्रायव्‍हेट जेट-
माल्ल्या यांच्‍याकडे बोईंग 272, एअरबस A319 ACJ, हॉकर HS125, याशिवाय गल्‍फ स्‍ट्रीम-3 सारखे प्रायव्‍हेट जेट आहेत.

याट्स कलेक्‍शन-
विजय माल्ल्या हे दोन लक्झरिअस याट्सचे मालक आहेत. या याट्सवर एक हेलीपॅड असून दोन बर्सडीज कार ठेवण्‍याची सोय करण्‍यात आली आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा विजय माल्ल्याच्‍या जेट आणि कारची फोटो...
बातम्या आणखी आहेत...