आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माल्याला कसाबच्या बॅरकमध्ये ठेवले जाणार; भारतात आणल्यानंतर राहणार आर्थर रोड तुरुंगात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने लंडनच्या कोर्टात ही माहिती दिली आहे. - Divya Marathi
भारताने लंडनच्या कोर्टात ही माहिती दिली आहे.
मुंबई - भारतात अब्जावधींचे कर्ज बुडवून ब्रिटनला स्थायिक झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाणार आहे. भारतात आणल्यानंतर विजय माल्याला कुठे ठेवणार आणि त्या तुरुंगात काय व्यवस्था आहे, याचा तपशील भारताने लंडनच्या कोर्टात दिला आहे. त्यानुसार, 26/11 हल्ल्याचा एकमेव जीवंत पकडलेला आणि नंतर फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब ज्या बॅरकमध्ये होता, त्याच बॅरकमध्ये माल्याला ठेवले जाणार आहे. 
 
 
- विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मुत्सद्दी आणि न्यायलयीन लढा सुरू आहे. त्याच अंतर्गत लंडनच्या एका कोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी भारताने विजय माल्याला कोणत्या तुरुंगात आणि कशा प्रकारे ठेवणार याची माहिती दिली आहे. 
- केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी कोर्टात याबाबतचा अहवाल सोमवारी लंडनच्या न्यायालयात दाखल केला आहे. 
- 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे 2500 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. 
- जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने लंडन कोर्टात माल्ल्याविरोधातील महत्वाचे पुरावे सादर केले होते. यामध्ये जून महिन्यात ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटचाही उल्लेख होता.
 
बातम्या आणखी आहेत...