आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. विजया मेहता यांना ‘भरतमुनी सन्मान’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय शास्त्रीय नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देत संस्कृती संवर्धनाचे व प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘नालंदा डान्स रिसर्च’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नालंदा नृत्योत्सवा’चे आयोजन शनिवारपासून तीन दिवस प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आले आहे. या वेळी ‘भरतमुनी सन्मान पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजया मेहता यांना प्रदान करण्यात येणार आहे.

भारतीय संस्कृती संवर्धनासाठी साहित्य, कला, संगीत या क्षेत्रांत ज्या दिग्गजांनी अमूल्य योगदान दिले अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा या हेतूने नालंदा नृत्योत्सवात भरतमुनी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. विजया मेहता यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भरतनाट्यम गुरू गुरू अडयार के. लक्ष्मण, कर्नाटकी संगीतात ठसा उमटवणारे डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचाही गौरव करण्यात येणार आहे.