आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaya Mehta To Honoured With Jeevan Gaurav Award

विजया मेहता यांना जीवन गौरव पुरस्‍कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता चतुरंग प्रतिष्‍ठानच्‍या जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे हे बावीसावे वर्ष आहे.
नाट्यक्षेत्राचा विकास आणि नाटकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मेहता यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये मुंबई किंवा डोंबिवलीमध्ये दोन दिवसांचे चतुरंग रंग संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्‍यात मेहता यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर, साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.