आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे माजी मंत्री विजयकुमार गावितांचा अखेर \'भाजप\'मध्ये प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी आज (शनिवार) अखेर भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) प्रवेश केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गावितांची हकालपट्टी करण्‍यात आली होती.

दरम्यान गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांनी नंदूरबार लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर स्वत: विजयकुमार गावित यांनीही महायुतीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. आघाडीच्या धर्माचे पालन न केल्याचा आरोप करत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने गावीतांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
नंदूरबार मतदार संघात भाजपाचे वर्चस्व वाढत गेले तर आघाडीचा जोर कमी झाला. मात्र आता गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नंदूरबारमधील आघाडी सरकारचे अस्तित्त्व संपूष्टात आल्या सारखेच आहे. तर त्या उलट भाजपचे या भागात यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी पोषक वातावरण झाले आहे.
फोटो - माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित