आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छातीत दुखू लागल्याने विजयपत सिंघानिया रुग्णालयात; प्रकृती स्थिर, 48 तास देखरेखीखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रेमंड समूहाचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मार्च महिन्यात सिंघानिया यांची बायपास सर्जरी झाली होती.

साऊथ मुंबई क्लब येथे डॉ. विजयपत सिंघानिया यांना छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हेमंत ठाकर यांनी त्यांची तपासणी केली आणि रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. 
 
सिंघानिया यांना उच्च रक्तदाब असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यांना 48 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेले सिंघानिया कुटुंब संपत्तीच्या वादामुळे चर्चेत  आहे. रेमंड या ख्यातनाम ब्रँडचे संस्थापक विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विजयपत सिंघानिया यांनी मुलगा गौतम यांच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवली होती. सध्या विजयपत सिंघानिया मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीत राहतात. मलबार हिलमधील घराचा ताबा मिळवण्यासाठी विजयपत सिंघानियांनी मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...