आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयानंतर विजेंदर म्हणाला, माझा किताब चिनी बॉक्सरला देऊ इच्छितो; सीमेवर शांतता हवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डबल चॅम्पियन बाॅक्सर विजेंदर सिंगवर काैतुकाचा वर्षाव केला जात अाहे. त्याचे सिनेअभिनेता बिग बी अमिताभ बच्चन अाणि अभिषेक बच्चन यांनी खास काैतुक केले. तसेच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही ट्विटरवरून त्याचे अभिनंदन केले. भारताच्या बाॅक्सर विजेंदर सिंगने शनिवारी मुंबईत डब्ल्यूबीअाे अाेरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन  झुल्फिकार मैमतअलीला नाॅकअाऊट करून हा किताब अापल्या नावे केला. यासह भारताचा हा ३१ वर्षीय बाॅक्सर डबल चॅम्पियनचा मानकरी ठरला. याशिवाय विजेंदर सिंगने  अापली प्राे बाॅक्सिंगमधील  विजयी माेहीम अबाधित ठेवली. चीनच्या झुल्फिकारने या फाइटमध्ये भारताच्या खेळाडूला नाॅकअाऊट करण्याचा दावा केला हाेता. मात्र, विजेंदरने हा दावा फाेल ठरवून फाइट जिंकली.  
 
विजेंदर म्हणाला...
चिनी बॉक्सर मैमत अली यावर मात केल्यानंतर विजेंदरने माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने आपला किताब आणि बेल्ट चिनी बॉक्सरला देण्याची इच्छा व्यक्त केली. भारत आणि चीन सीमेवर शांतता अावश्यक आहे, असेही तो पुढे म्हणाला.
 

‘ही फाइट अधिकच कठीण हाेती. मात्र, विजेंदर सिंगने सरस खेळीच्या बळावर चीनच्या बाॅक्सरचे अाव्हान परतवून लावले. यातून त्याला किताबावर अापले वर्चस्व प्रस्थापित करता अाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे  अभिनंदन,’ अशी प्रतिक्रिया सिनेअभिनेता अमिताभ बच्चनने दिली.  

हरभजनसिंग, वीरूदाकडून काैतुकाचे ट्विट 
टीम इंडियाचा माजी स्फाेटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग अाणि गाेलंदाज हरभजनसिंगने किताब विजेत्या विजेंदर सिंगवर ट्विटने काैतुकाचा वर्षाव केला. ‘बाॅक्सर विजेंदर सिंगचे खास काैतुक केले. शाब्बास मित्रा,’असे सेहवागने काैतुकाचा ट्विट केले. तसेच यासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. तुझे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्याने म्हटले. त्यापाठाेपाठ हरभजनसिंगने स्तुती करणारे ट्विट केेले.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...