आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikhe Patil Demand To Discuss About Kelkar Samiti

केळकर अहवालावर चर्चेसाठी जानेवारीत अधिवेशन बोलवावे- विखे पाटील यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहुचर्चित केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी या महिन्यात ५ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे बुधवारी केली आहे.
केळकर समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केला होता. या समितीच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी व त्यावर ठोस कारवाई करण्यासाठी ५ दिवसांचे विशेष अधिवेशन घेणे अतिशय गरजेचे आहे. जेणेकरून या अधिवेशनात चर्चेअंती राज्य सरकारला आगामी अधिवेशनात निधीची तरतूद करणे सोपे जाईल. निधी मंजूर झाल्यास राज्यातील सर्व विभागांना समान न्याय देता येईल. अन्यथा थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची चर्चा झाली तर तरतूद करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने विशेष अधिवेशनाची मागणी मान्य करावी, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
पाण्याचे भीषण संकट दूर करण्यासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून बाळासाहेब विखे-पाटील समितीने आघाडी सरकारला अहवाल दिला होता. त्याचीही अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही विखे म्हणाले.