आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळ विस्तारात कलंकित नेते नकाेत, विराेधी पक्षनेते विखे पाटील यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा राज्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश टाळावा; अन्यथा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला तीव्र रोषाला तोंड द्यावे लागेल,’ असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना दिला.

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर काही नावे समाेर अाली अाहेत. त्याबाबत विखे पाटील म्हणाले की, ‘सार्वजनिक पैशाचा अपहार आणि जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असलेल्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. मुळातच मंत्रिमंडळातील निम्म्या सदस्यांवर आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात वारंवार दाद मागितल्यानंतरही सरकारने संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्यामुळे सरकारने कलंकित मंत्र्यांच्या यादीत आणखी भर घालून राज्यातील जनतेची अधिक फसवणूक करू नये. तसेच मागील दीड वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा आणि शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता या विस्तारात राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री आणि पूर्णवेळ कृषिमंत्री द्यावेत,’ अशीही मागणीही त्यांनी केली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...