आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम काळे, राजूरकरांसह ११ अामदारांना निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या ५ डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या विधान परिषदेतील ११ सदस्यांना शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप देण्यात आला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातून हे सदस्य निवडून आले होते. डिसेंबरमध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत असले तरी याच दरम्यान त्यांची मुदत संपत असल्याने त्यांना पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप देण्यात आला. यात राष्ट्रवादीचे ४, भाजप ४, काँग्रेस २ तर एका अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.

सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी या सदस्यांच्या निरोपाचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिवाकर रावते आदींनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
निवृत्त अामदार : संदीप बाजोरिया (यवतमाळ- राष्ट्रवादी काँग्रेस), अमरनाथ राजूरकर (नांदेड- काँग्रेस), प्रभाकर घार्गे (सांगली- सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस), राजेंद्र जैन (भंडारा गोंदिया -अपक्ष), अनिल भोसले ( पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस), गुरुमुख जगवानी (जळगाव- भाजप), डॉ सुधीर तांबे (नाशिक- काँग्रेस), डॉ. रणजित पाटील (अमरावती पदवीधर मतदारसंघ, भाजप), विक्रम काळे ( औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस), ना. गो. गाणार ( नागपूर शिक्षक मतदारसंघ, भाजप), रामनाथ मोते (कोकण शिक्षक मतदारसंघ, भाजप).
बातम्या आणखी आहेत...