आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मुलाला पोलिस सेवेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक म्हणून 25 वर्षीय दीपेश शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
दिवंगत विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नियुक्तीपत्र दीपेशच्या हाती सुपूर्द केले.
दीपेश शिंदे हा बीएससी-आयटी पदवीधर असून, मालाडमधील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. पोलिस सेवेत दाखल होण्याबाबत पत्र हाती आल्यानंतर त्याने नोकरीला सोडचिठ्ठी दिली आहे.
 
“माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. झोकून देऊन काम करताना वडिलांना पाहिलंय. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि पोलिस सेवेत माझं सर्वोत्तम काम करेन.”, असं दीपेशने सांगितले.

खारजवळ 23 ऑगस्ट 2016 रोजीवाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी 17 वर्षीय मुलाला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडले. त्याच्याकडे वाहतूक परवानाही नव्हता. याबाबत चौकशी सुरु असतानाच अल्पवयीन आरोपीने अहमद कुरेशी या आपल्या भावाला बोलावून घेतले. त्याच्या भावाने मागून विलास शिंदेंच्या डोक्यात रॉडने हल्ला करुन तिथून पळ काढला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 31 ऑगस्ट 2016 रोजी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...