आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य माणूस हा विलासरावांच्या श्रद्धेचा विषय होता : पृथ्वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य माणूस हा विलासरावांच्या श्रद्धेचा विषय होता. त्याला केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी राज्य व देशाचा कारभार सांभाळला. प्रत्येक खात्याचा कारभार त्यांनी समर्थपणे सांभाळला. तळागाळातल्या लोकासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. लोकहितेशी निर्णयातून ते त्या संधीचे सोने करीत होते. केंद्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता. तथापि, काळाने त्यांना गाठले. त्यांच्या निधनाने कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एका कर्तृत्व संपन्न, सुस्वभावी माणसाला देश पारखा झाला आहे.