आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ समोरून आला असता तर त्याने विलासरावांना कधीच नेले नसते : मुंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्ती म्हणून विलासराव श्रेष्ठ होते. त्यांची संवेदनशीलता राजकारणापल्याड होती. लाखो लोक त्यांना जाणणारे व मानणारे होते. राजकारणातली अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. त्यांनी मानवतेचा पॅटर्न निर्माण केला. शिक्षण, सहकार, उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. काळ समोरून आला असता तर त्याने विलासरावांना कधीच नेले नसते. त्याने पाठीमागून येऊन डाव साधला. ‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ ही उक्ती विलासरावांनी प्रत्यक्षात आणली आहे. आयुष्याची वाटचाल करताना त्यांचा कर्मयोग सर्वांना प्रेरणा देईल. सच्चा, उमदा मित्र गमावल्याची सल मला आयुष्यभर बोचत राहील.