आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांनी लोकहिताची कामे करून यशवंतरावांचा वारसा जपला : शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकासासाठी यशवंतराव चव्हाणांनी पंचायत राजला प्राधान्य दिले होते. झेडपीच्या शाळातून शिक्षण घेतलेले विद्यार्थीही उद्याचा महाराष्ट्र समर्थपणे सांभाळतील यावर त्यांचा विश्वास होता. तो विलासरावांनी सार्थ केला. ग्रामीण भागातही कर्तबगारीची वानवा नाही, हे त्यांनी दाखवून दिले. ग्रामपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांना आपल्या कर्तृत्वाने यशोभरारी घेतली. लोकहिताची अनेक कामे करून यशवंतरावांचा वारसा जपला. तथापि, देशाची काळजी वाहणारा हा माणूस स्वत:च्या आरोग्याप्रती गंभीर राहिला नाही. त्यांची प्रकृती पाहून मी विचारणा करीत असे, त्यावर ते वजन कमी करतोय, असे सांगायचे. परिवारासह सहका-यांनाही वेदनेचा दाह लागू नये म्हणून दु:ख अंगावर काढले.