आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासराव सदैव गरिबांच्या बाजूने उभे राहिले : सुशीलकुमार शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासरावाचे अकाली जाणे देश व महाराष्ट्राच्या मनाला चटका लावणारे आहे. 32 वर्षांची आमची मैत्री होती. राजकारणात राहूनही हास्य- विनोदावर आम्ही कधी विरजण पडू दिले नाही. विलासरावांना समाजाची नाडी माहिती होती. देशाच्या राजकारणात ते सदैव गरिबांच्या बाजूने उभे राहिले. सन 2003 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या माझ्या हाती दिल्या. आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी माझी निवड झाल्यानंतर सोलापूरकरांनी ठेवलेल्या माझ्या सत्कारास ते आले होते. तुम्ही आनंदाने जा, मी लातूरचा आहे. सोलापूरची जकात अदा केल्याशिवाय मी लातूरला जाणार नाही, असा शब्द त्यांनी मला दिला होता. त्यांच्या आठवणी विसरता येणार नाहीत.