आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विलासराव देशमुखांची प्रकृती बिघडली; चार्टर्ड विमानाने चेन्नईला हलविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष विमानाने त्यांना मुंबईहून सायंकाळी 6 वाजता येथे आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती देण्यास रुग्णालय सूत्रांनी नकार दिला. 67 वर्षीय विलासरावांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांपासून विलासरावांवर उपचार सुरू होते.
लातूरमध्ये अस्वस्थता : विलासराव आजारी असल्याच्या वृत्तामुळे लातूरमध्ये अस्वस्थता आहे. माहिती मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी फोनाफोनी चालवली आहे. प्रकृतीबद्दल माहिती देण्यास कुटुंबीयांपैकी कोणी उपलब्ध होऊ शकले नाही.
तपासणीसाठी विलासराव देशमुख ब्रीच कँडी रुग्णालयात