आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग: कुसुर- बौध्दवाडीजवळील सुख नदीवर संरक्षण भिंतीची गरज, दुर्घटना घडण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी - वैभववाडी- उंबर्डे मार्गावरील कुसूर-बौध्दवाडी दरम्यान सुखनदीवर संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.               

वैभववाडीमधील कुसुर-बौध्दवाडी जवळ सुखनदीवर संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी दरवर्षी झालेल्या पावसामुळे रस्त्याकडील काहीसा भाग ढासळला आहे. रस्ता आणि नदीचे पात्र काही फुटावर असल्याने याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. सुखनदीचे पात्र मोठे असल्याने भुईबावडा पंचक्रोशीतील नद्यांचे पाणी याच सुख नदीला मिळते. त्‍यामुळे ही नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहते. अशावेळी दुर्घटना होण्‍याची शक्‍यता अधिक असल्‍याचे ग्रामस्‍थांनी सांगितले आहे.  

मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सुखनदीने रौद्र रुप धारण करुन धोक्याची पातळी ओलांडली होती. कुसुर-बौध्दवाडी येथील मुख्य रस्त्यावर या नदीचे पाणी आल्याने वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भविष्यात याठिकाणी संबंधित विभागाने फेरसर्व्हेक्षण करुन संरक्षण भिंत बांधावी. वेळीच याठिकाणी उपाययोजना न  केल्‍यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भिती ग्रामस्‍‍थांनी वर्तवली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...