आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड सेलिब्रिटीजना हिंदी शिकवतो हा टीचर, ठाकरे कुटुंबियांशी आहे थेट संपर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी टीचर विनय शुक्ला आपली स्टूडंट अॅक्ट्रेस तमन्ना भाटियासोबत... - Divya Marathi
हिंदी टीचर विनय शुक्ला आपली स्टूडंट अॅक्ट्रेस तमन्ना भाटियासोबत...
मुंबई- फिल्मी सितारे पडद्यावर आपल्याला फर्राटेदार हिंदी बोलताना दिसतात, पण त्यातील बहुतेकांना हिंदी तंग करते. येथे टिकण्यासाठी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सिता-यांना हिंदी शिकण्याची गुर्मी आली आहे. यात त्याला हिंदीचे टीचर विनय शुक्ला यांचे मोठे योगदान आहे. ठाकरे परिवारातील मुले...
 
- बाहुबलीसह अनेक फिल्ममध्ये आपली अदाकारी दाखविणारी तमन्ना भाटिया, 'टॉयलेट एक प्रेम कथा' मुळे फेमस झालेली भूमी पेडनेकर यासारख्या अॅक्ट्रेसेससह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची दोन्ही मुले आदित्य व तेजस सुद्धा हिंदीत कमजोर होते. मात्र, विनय शुक्ला यांच्यामुळे त्यांनी या भाषेवर आता चांगली पकड घेतली आहे.
- हिंदी शिक्षक विनय शुक्ला सांगतात की, हे कार्य करून मी हिंदीची सेवा करत नाही तर हिंदी माझी सेवा करत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्कूल-कॉलेजमध्ये हिंदी शिक्षक बनण्याऐवजी शुक्ला यांनी ICSC आणि CBSE च्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवायला सुरुवात केली.
 
यांनी शिकली आहे विनय सरकडून हिंदी-
 
- हिंदी आणि तमिळ-तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया आपले शिक्षण सुरु झाले असतानाच फिल्ममध्ये आली. तिने विनय शुक्लाकडून हिंदी शिकली आहे.
- ‘टायलेट एक प्रेम कथा’ ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘जोर लगा के हायसा’ सारखी फिल्ममध्ये बॉलिवूडमध्ये आपला दम दाखवलेली भूमी पेडनेकर विनय शुक्लांची शिष्य आहे.
- ‘माय नेम इज खान’ मध्ये शाहरुख खानच्या मुलाची भूमिका करणारी अर्जुन औजला यानेही शुक्लाकडून हिंदी शिकली.
- सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कुमार सानूचा मुलगा जीको भट्टाचार्य आणि अभिनेता अनुपम खेरची पुतणी वृंदा खेर शुक्लचे शिष्य आहेत.
 
हिंदीमुळे आज नेता बनले-
 
- हिंदी शिक्षणामुळेच विनय शुक्ल आज शिवसेनेचे सक्रिय नेता बनले आहेत. शुक्ला युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि त्यांचा छोटा भाऊ तेजस ठाकरेचे हिंदी शिक्षक राहिले आहेत.
- शुक्ला सध्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रभारी आहे. आज ठाकरेंचे निवास स्थान मातोश्रीत त्यांना थेट प्रवेश मिळतो.
 
बाजारातील गरजेमुळे हिंदीची मागणी वाढली- 
 
- हिंदीच्या भविष्याबाबत शुक्ला म्हणतात की, ही भाषा भारत सरकार आणि हिंदी शिक्षकांच्या मुळे जीवंत राहिली नाही. बाजारातील गरजेमुळे हिंदी पुढे गेली आहे. 
- मात्र, हिंदीबाबत सरकारचा भूमिकेमुळे मी दु: खी आहे. माझे घर सरकार नव्हे तर हिंदीमुळे चालते असेही शुक्ला यांनी सांगितले.
 
पुढे स्लाई़डद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...