आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसभापतींविषयी अपशब्द; मेटेंवर दिलगिरीची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्यातील गंगा गोयल या बिल्डरने सदनिकाधारकांची फसवणूक केल्याबद्दलच्या चर्चेत उपसभापती यांच्याविषयी अपशब्द काढल्याबद्दल आमदार विनायक मेटे यांच्यावर मंगळवारी विधान परिषदेत दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली.

मेटे यांनी ही लक्षवेधी मांडली होती. या व्यावसायिकाने इमारतीची उंची, सदनिकांचे क्षेत्रफळ, वाहनतळ याबाबत कोणतेही उल्लघंन केलेले नसून याबाबत पुणे पालिकेकडे एकही तक्रार नसल्याचे नगरसविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांिगतले. तसेच मेटेंनी पुरावे दिल्यास कारवाईचे आश्वासनही दिले. नंतर उपसभापती डावखरे यांनी पुढची लक्षवेधी सूचना पुकारली. त्यावर ‘माझ्या प्रश्नाला मंत्री उत्तर देत असताना पुढची लक्षवेधी कशी पुकारता? कामकाज चालवण्याची ही पद्धत नाही. तुम्ही पक्षपाती आहात’, असा आरोप मेटे यांनी उपसभापतींवर केला. त्यावर राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी मेटेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. अखेर मेटेंनी अपशब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.