आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांना मिरच्या झोंबणारच : मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बांधकाममंत्री छगन भुजबळ व आमदार विनायक मेटे या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. भुजबळांनी मेटेंवर अस्तनीतील निखारे म्हणून टीका केल्यानंतर मेटेंनी ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हणत त्यांच्यावर पलटवार केला. ‘लोकलेखा समितीचा सदस्य म्हणून विधान परिषदेत हा अहवाल सादर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मी ते काम केल्याने भुजबळ यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. भ्रष्टाचाराचे काळबेरे करणार्‍या भुजबळांना मिरच्या झोंबणारच’, अशी बोचरी टीकाही मेटेंनी केली.

महाराष्ट्र सदनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत लोकलेखा समितीने भुजबळांचीी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. विधीमंडळात विधानसभा तसेच विधान परिषदेत हे अहवाल ठेवण्यात आले. मात्र राष्ट्रवादीचे आमदार असूनही मेटेंनी पुढाकार घेत तो अहवाल मांडल्यामुळे भुजबळ मेटेंवर प्रचंड संतापले.

‘लोकलेखा समितीने वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले असून या समितीत सर्वपक्षीय 25 आमदार आहेत. या समितीने थेट बांधकाम झालेल्या ठिकाणांवर भेट देऊन माहिती घेतली आहे. या माहितीनंतर भुजबळांवर भ्रष्टाचारावर ठपका ठेवताना समितीतील सर्व आमदारांचे एकमत झाले. दोन्ही सभागृहात अहवाल ठेवल्यानंतर लगेचच भुजबळांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपल्यावरील ठपका झटकला. मात्र हे त्यांचे धंदे जुनेच आहेत’, असे मेटे म्हणाले.