आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete News In Marathi, Maratha Community Reservation, Divya Marathi

‘राष्‍ट्रवादी’पेक्षा मराठ्यांच्या कल्याणालाच प्राधान्य, मेटे यांचा पक्षाला घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्यासाठी पक्षापेक्षा मराठा समाज महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करतानाच मंगळवारी रात्री होऊ घातलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणूनच रद्द करण्यात आल्याचा आरोप करत राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी पक्षाला घरचा आहेर दिला.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आघाडीवर टीका करतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा ‘झारीतले शुक्राचार्य’ असा उल्लेख करणा-या मेटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यावर ‘आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यावर आपण भूमिका मांडू. आपल्याला मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्याची चिंता आहे. नोटिशीची नाही,’ असे मेटे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी मंगळवारी रात्री मंत्रिमंडळाची बैठक याचसाठी होती; पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. हे करताना कोणी राजकारण केले, कशासाठी केले, हा तपशील समोर आला पाहिजे. सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला धडा शिकवणार असल्याचे मेटे म्हणाले.