आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinda Life Achivement Award Presented To Mahanor

महानोर यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार मुंबईत प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आडवळणाच्या गावी येऊन 74 मध्ये विंदांनी माझी पाठ थोपटली होती, आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळतो आहे यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही,’ अशा शब्दात प्रसिद्ध निसर्ग कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाच्या मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ते बोलत होते.


मराठी साहित्य विश्वातील मान्यवरांना गौरवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य (वाङ्मय) पुरस्कार सोहळा 2012’ आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विंदा करंदीकरांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार महानोर यांना देण्यात आला. 5 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर, मिलिंद गुणाजी,प्रवीण दवणे, लेखक अच्युत गोडबोले, अशोक कोठावळे यांच्या 'मॅजिस्टिक प्रकाशनाला'ही गौरवण्यात आले.