आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vindu Now Blaming On Police, Betting Is Not A Crime

नेत्यांना व त्यांच्या मुलांना पोलिस का पकडत नाही?- विंदू, \'सट्टा लावणे गुन्हा नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विंदू दारा सिंगने आता पोलिसांवरही शरसंधान साधायला सुरुवात केली आहे. विंदूने पोलिसांवर आरोप केला आहे की, आयपीएलमध्ये सट्टेबाजी करणा-या नेत्यांना व त्यांच्या मुलांना पोलिस का पकडत नाही आणि तपास करीत नाही.

आयपीएल फिक्सिंग केसप्रकरणी आरोपी असलेला विंदूने मुंबई पोलिस क्राइम ब्रॅच मुख्‍यालयात हजेरी लावण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होता. विंदूला जेव्हा जामीन मंजूर करण्यात आला होता तेव्हा त्याला व मयप्पनला दिवसाआड हजेरी लावण्यास सांगितले होते.

विंदूने सांगितले की, भारतात जर सट्टेबाजी रोखायची असेल तर, सर्वप्रथम बुकींना पकडले गेले पाहिजे. खरं तर सट्टा लावणे किंवा सट्टेबाजी करणे हा गुन्हा नाही. सट्टा लावला म्हणून पोलिस माझी खूपच चौकशी करीत आहे. मग येथील एवढे नेते व त्यांची मुले लट्टा लावतात मग त्यांना पोलिस का पकडत नाहीत.