Home | Maharashtra | Mumbai | vinoba bhave death anniversary

गांधीविचारांचा सर्वोत्तम प्रयोग करणारे आचार्य विनोबा भावे; घडवली इतिहासातील व्यापक चळवळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 15, 2017, 12:03 AM IST

विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावात झाला. विनायक

 • vinoba bhave death anniversary
  मुंबई- विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावात झाला. विनायक नरहरी भावे म्हणजेच आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान 1942 मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
  संत विनोबा भावे यांनी आपले सारे जीवन दुसऱ्याची सेवा करण्यात घालवले आणि भारतीय समाजाला सुसंस्कारांचा उपदेश दिला. बालपणात त्यांना त्यांचे माता-पिता विनायक नावाने बोलावत असत. परंतु महात्मा गांधींनी एकदा त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्यासाठी विनोबा शब्दाचा वापर केला. तेव्हापासून सर्व लोक त्यांना विनोबा भावे म्हणू लागले. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन 1932 मध्ये त्यांना तुरुंगवास घडला. धुळे कारागृहामध्ये त्यांनी शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.
  1936 पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च 1948 मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले.
  स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना’ केली. या समाजाच्या शिवरामपल्ली येथील तिसर्यात अधिवेशनानंतर 15 एप्रिल 1951 रोजी साम्यवादी हिंसात्मक चळवळींनी त्रस्त झालेल्या तेलंगणात शांतीचा संदेश पोहोचविण्याच्या हेतूने विनोबीजींनी पदयात्रा सुरु केली. या पदयात्रेतूनच भूदान चळवळीचा आकस्मिक रितीने प्रारंभ झाला. शांतियात्रेचे भूदानयात्रेत रूपांतर झाले. नैतिक संदेशाला व्यावहारिक कृतीची जोड मिळाली.
  या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्यांभना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ग्रामदान, ग्रामराज्य, संपत्तीदान या संकल्पनांचाही त्यांनी चळवळीत अंतर्भाव केला. या अनोख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शांततापूर्ण मार्गाने असंतुलित जमीन मालकीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना बहाल केली.
  पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 • vinoba bhave death anniversary
  ‘सब भूमि गोपाल की’ हा या चळवळीचा नारा होता. ‘आपल्यापाशी जरुरीपेक्षा जे अधिक प्रमाणात आहे त्याचा काही भाग ज्यांच्यापाशी ते मुळीच नाही त्यांना आपण प्रेमाने दिला पाहिजे हा या नव्या युगाचा धडा आहे असे विनोबांनी वर्षानुवर्षे समाजाला समजून सांगितले.’या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला. दिनांक 15 नोव्हेंबर 1982 रोजी सकाळी 9.40 वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या 88 व्या वर्षी प्राणत्याग केला.  

Trending