मुंबई- माजी कसोटीपटू विनोद कांबळीने आपल्याच सोसायटीत राहणा-या एका परदेशी महिलेविरोधात वर्णभेदाची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. कार पार्क करीत असताना झालेल्या वादातून परदेशी महिलेने आपल्यावर वर्णभेदात्मक टिप्पणी करीत शिव्या दिल्याचे कांबळीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हा अवमान केवळ माझा नसून संपूर्ण देशाचा असल्याचे सांगत या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विनोदने केली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी कांबळीने बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, बांद्रा पोलीस आज संबंधित परदेसी महिलेची विचारपूस करुन पुढील कारवाई करतील, असे सांगितले जात आहे. तसेच याप्रकरणी तिचीही बाजू ऐकून घेतली जाईल, असे सांगण्यात आले.