आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डाला मिळणाऱ्या सवलती पहिलीतही, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता यावे या उद्देशाने बोर्डाच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी सवलत इयत्ता 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्याच्या शिक्षषण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विशेष गरजू विद्यार्थ्यांना (दिव्यांग) 1ली ते १२ वी पर्यंत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत शैक्षणिक दृष्ट्या पूरक सोयी सुविधा आणि नियमित शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळणार आहे.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना (दिव्यांग) शैक्षणिक सहाय्ययतेची गरज लागते. यापूर्वी दिव्यांग विद्यार्थ्यांना १० वी, १२वी या बोर्डाच्या परीक्षेत सवलती मिळत होत्या. आजच्या निर्णयामुळे इयत्ता १ली ते १२वी पर्यंत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत शैक्षणिकदृष्टया पुढे जाण्याच्या दृष्टीने सर्व सोयी सवलती दिल्या जातील, असे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहननुसार यापुढे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याना आणि व्यक्तींना "दिव्यांग' असे संबोधण्याचा राज्य शासन निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी प्रसिध्द केला अाहे.
शालेय पातळीवर इ. ली ते वीसाठी सवलती मिळत होत्या. पण त्यात सूसुत्रता नव्हती. प्रथमच अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, डॉक्टर यांच्याबरोबरीने स्वयंसेवी संस्था पालकांशी व्यापक स्तरावर चर्चा करण्यात आली. पालकांच्या दैनंदिन अनुभवांची नोंद घेण्यात आली.
वैद्यकीयदृष्टीने येणाऱ्या मर्यादा त्याचबरोबर पालकांचा दैनंदिन जीवनातील अनुभव यांचा मेळ घातला. सर्व घटकांशी एकत्रित विचार करुन त्यांना आवश्यक सोयी सुविधा देता येतील याविषयी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर आजचा निर्णय घेतल्याचे तावडे म्हणाले.

दिव्यांगांची प्रगती
समावेशितशिक्षण योजनेतील हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्याना पालकांना निश्चितच मदत होईल आणि सदर मुले शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करतील असेही तावडे यांनी िवश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र पहिले राज्य
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी "मन की बात' मध्ये विकलांग व्यक्तींना "दिव्यांग' संबोधावे, असे आवाहन केले होते. यापुढे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी "दिव्यांग' हा शब्दप्रयोग प्रचलीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. असा पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचाे तावडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...