आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ तासांचा निर्णय अद्याप नाही, विनाेद तावडे यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पहिली ते आठवीच्या शाळेचा कालावधी सहा तासांवरून आठ तास करण्याच्या धोरणाचा प्रस्तावित मसुदा संकेतस्थळावर सादर केला असला तरी अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. संबंधितांनी याबाबत सूचना-अभिप्राय सादर करावेत. सर्वांच्या सूचना-अभिप्राय लक्षात घेऊन सदर धोरण अंतिम होईल, असे शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी रविवारी स्पष्ट केले.
सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने प्रथमच गावपातळीवर जाऊन ३२ हजार गावांत या शैक्षणिक धोरणावर चर्चा घडवून आणली. संबंधितांची मते जाणून घेतली. चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेल्या बाबी जनतेच्या विचारासाठी संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, शैक्षणिक धोरणाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे तावडे यांनी सांगितले. शैक्षणिक धोरण ठरवताना या क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशीही चर्चा करण्याचा माझा आग्रह असतो. पण काही मंडळी आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच विनाकारण आता अकांडतांडव करीत आहेत, असा आरोपही तावडे यांनी केला आहे.

संघटनांनी अाकांडतांडव करू नये
शिक्षण हक्क समिती, शिक्षक भारती अाणि आमदार कपिल पाटील यांनी आठ तासांच्या शाळा धोरणाला विरोध केला अाहे. या निर्णयामुळे शाळांचे केवळ कोंडवाडे होतील, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यावर ‘काही शिक्षक आमदार अाणि शक्षक संघटना या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या नव्या शैक्षणिक प्रस्तावाला विरोध करत आहेत. त्यांना गुणवत्ता वाढीची कोणतीही चिंता नाही. ते केवळ अाकांडतांडव करण्यात धन्यता मानत आहेत,’ असे प्रत्युत्तर तावडे यांनी प्रस्तावाला विरोध करणाऱ्या आमदार अाणि संघटनांना दिले आहे.