आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vinod Tawade Criticized On Home Minister R R Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहमंत्र्यांचा पोपट झालाय, विनोद तावडे यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत असून गृहमंत्री आर. आर. पाटील केवळ बोलका पोपट झाले आहेत. त्यांच्यासारखा अकार्यक्षम गृहमंत्री पदावर राहिल्यास राज्यातील महिलांना कायमच असुरक्षित वाटत राहील, अशा तिखट शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पाटील यांच्यावर टीका केली.

गृह खात्यावर नियंत्रण ठेवण्यात पाटील यांना अपयश आले आहे. पोलिसांच्या नेमणुका राष्ट्रवादी व काँग्रेस हायकमांडचे करतात. मुंबईइतके सुरक्षित शहर जगात नाही, अशी वल्गना पाटील यांनी केली होती. परंतु, या घटनेवरून मुंबई खरेच सुरक्षित शहर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका तावडे यांनी केली.