आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, Hailstorm, Crop Insurance, Divya Marathi

शेतक-यांना वाचवण्‍यासाठी पीक कर्जमाफी द्या - विनोद तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गारपिटीच्या संकटातून शेतक-यांना वाचवण्यासाठी तातडीने पीक कर्जमाफी घोषित करावी. तसेच कोरडवाहू शेतक-यांसाठी हेक्टरी 25, तर फळबागांकरिता 50 हजार मदत घोषित करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.

सरकारतर्फे कोरडवाहूसाठी हेक्टरी 4,500 तर बागायतीकरिता 9 हजारांची मदत दिली जाते. मात्र, शेतक-यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता शेतीसाठी एकरी 10 हजार म्हणजे हेक्टरी 25 हजार, तर फळबागांकरिता एकरी 20 हजार, म्हणजेच हेक्टरी 50 हजार मदत देणे अत्यंत गरजेचे आहे, असेही तावडेंनी स्पष्ट केले.