आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून शिवसेनेला 40 जागांचे गिफ्ट: तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेत काँग्रेसने दहा जागांवर शिवसेनेकडून गिफ्ट घेतले असून त्यांनीही शिवसेनेला ४० जागांवर ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’ दिले अाहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत जागांची अदलाबदल झाली असून ज्या भागात अटीतटीची लढाई आहे तिथे मतांचे विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेने व्हॅलेंटाइन गिफ्टची अदलाबदल केल्याचा आरोप भाजपचे नेते व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केला.  
 
‘ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी लढवावी अशी मुंबईकरांना अपेक्षा आहे.  परंतु अर्धवटराव, राम मंदिर, सैनिकांना काय जेवण मिळते या विषयावर बोलले जात आहे जे महापालिकेशी संबंधित मुद्दे नाहीत,’ असे सांगतानाच शिवसेना आणि काँग्रेसने ९२ जागांवर हातमिळवणी केल्याचा आरोपही तावडे यांनी केला.   
बातम्या आणखी आहेत...