आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्राचे \'तोमर\': विनोद तावडेंची पदवी बनावट विद्यापीठातून- काँग्रेसचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अभियांत्रिकी विषयातील पदवी अनधिकृत विद्यापीठातून प्राप्त केल्याने ती बनावट असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी केला आहे.

पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून तावडेंनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. मात्र, या विद्यापीठाला अभियांत्रिकी पदवी देण्याची कोणतेही परवानगी नाही. तसेच या विद्यापीठाला यूजीसीने अनधिकृत म्हणजेच बनावट ठरवले असल्याचे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. राज्याचा शिक्षणमंत्रीच बनावटगिरी करीत असेल तर काय म्हणायचे? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसने तावडेंचा राजीनामा मागितला आहे.
दरम्यान, निरूपम यांनी केलेले सर्व आरोप तावडे यांनी फेटाळून लावले आहेत. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून मी रीतसर अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. हे पदवी घेताना विद्यापीठाला यूजीसीने मान्यता दिली नव्हती. प्रवेश घेतेवेळी तसे आम्हाला सांगण्यात आले होते. सदर अभियांत्रिकी कोर्सला शासन मान्यता नाही हे मला विद्यापीठाने प्रवेश घेताना सांगण्यात आले होते. या कोर्सला मी 1980 मध्ये प्रवेश घेतला. हा कोर्स अर्धवेळ शिक्षण व अर्धवेळ इंटर्नशिप असा होता. मी 1984 ला हा कोर्स करून पास झालो. ज्ञानेश्वर विद्यापीठात शिक्षण घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे तावडेंनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...